जिल्हापेठचा दुचाकी चोर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
महा पोलीस न्यूज | ७ मे २०२४ | शहरातील पांडे चौकातील पोस्टे ऑफीसच्या गेट बाहेर लावलेली दुचाकी चोरी झाल्याची घटना दि.२२ डिसेंबर रोजी घडली होती. एमआयडीसी पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत एकाला अटक केली असून त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
मेहरून परिसरात राहणारे राहुल संजय वाघ रा. हे दि.२२ रोजी त्यांची वापरती मोटर सायकल क्रमांक एमएच.१९.डीएल.१५९४ घेऊन दुपारी ३ वाजता जळगाव शहरातील पांडे चौकातील पोस्टे ऑफीसला आले होते. दुचाकी गेट बाहेर लावुन पोस्टातील काम करण्यासाठी गेले असता कुणीतरी त्यांची दुचाकी चोरी केली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोस्टे येथे दि.२६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, सदर गुन्हयतील संशयीत आरोपी नामे महेश राजेश गायकवाड, वय- २० वर्ष रा. मेहरुण, रामेश्वर कॉलनी हा संशयीतरित्या एक मोटर सायकल घेवुन रामेश्वर कॉलनी येथे फिरत आहे. त्यावेळी त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत कळविले. पथकाने तांत्रिक माहिती व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मदतीने बौद्धिक कौशल्याचा वापर अंजिठा चौफुली येथून त्याला अटक केली. त्याचाकडे गुन्हयातील वाहन मिळून आली. त्याने ती दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
संपूर्ण कामगिरी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना किशोर पाटील, सचिन पाटील, पोकॉ विनोद आस्कार, साईनाथ मुंढे, चंद्रकांत पाटील अशांनी केली आहे. आरोपीला पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा पेठ पोस्टे यांचे ताब्यात देण्यात आले आहे.