Crime

वाळू माफियांचा हैदोस : रस्त्यात गाडी अडवून तलवार-कोयत्याने तिघांवर जीवघेणा हल्ला

चार जणांविरोधात गुन्हा दाखल; गंभीर जखमींना धुळे येथे हलवले

वाळू माफियांचा हैदोस : रस्त्यात गाडी अडवून तलवार-कोयत्याने तिघांवर जीवघेणा हल्ला

चार जणांविरोधात गुन्हा दाखल; गंभीर जखमींना धुळे येथे हलवले

भडगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील वाक गावाजवळ वाळू माफियांनी रस्त्यात गाडी अडवून तलवार, कोयता आणि लाकडी दांडक्यांनी तिघांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री ११.३० वाजता घडली. या प्रकरणी चार जणांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, गंभीर जखमींना धुळे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

धक्कादायक हल्ल्याचा थरार
राकेश सुधाकर पाटील (वय २८, रा. वाक) यांच्या फिर्यादीवरून चार आरोपी – योगेश कैलास पाटील, उमेश शालीक पाटील, सतिष शालीक पाटील आणि अक्षय बारकू पाटील (सर्व रा. वाक, ता. भडगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, आरोपींच्या इंडिका व्हिस्टा (MH-42-AU-4249) गाडीने पाठीमागून धडक दिल्यानंतर चारही आरोपी खाली उतरले. त्यानंतर योगेश पाटील याने तलवारीने राकेशच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. राकेशने वार चुकवत असताना तलवार डाव्या मनगटावर लागून गंभीर जखम झाली.

हल्ल्यात राकेशचे वडील सुधाकर पाटील आणि काका किशोर पाटीलही जखमी झाले. काकांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात मारण्यात आले. आरोपींनी “सोडू नका, कापून टाका,” असे धमकीवजा शब्द वापरत हल्ला सुरू ठेवला. कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रसंगावधान राखून जखमींना बचावात घेऊन ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र हल्लेखोरांनी रुग्णालयाकडे जातानाही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(२), २८१(३), ३५१(२) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button