Social

वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन

वंदे मातरम् गीत हा आपला स्वाभिमान – ना. गिरीश महाजन

वंदे मातरम् रॅलीने राष्ट्रभक्तीचा जागर ; डॉ. उल्हास पाटील महाविद्यालयात समारोप

जळगाव- जगात असा एकमेव आपला भारत देश आहे, ज्याला आपण आईचे स्वरूप दिले आहे. भारतमातेचे वर्णन करणारे गीत वंदे मातरम् हा केवळ उत्सव नसून तो आपला प्रत्येकाचा स्वाभिमान असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

बंकीमचंद्र चट्टोपाध्याय लिखीत वंदे मातरम् या राष्ट्रगीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीतर्फे जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणावर झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे, आमदार अमोल जावळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस (पूर्व) डॉ. केतकी पाटील, गोदावरी फॉउंडेशन सचिव डॉ.वर्षा पाटील, परिक्षत बर्‍हाटे, राकेश पाटील, निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा दूध संघाच्या संचालिका भैरवी पलांडे, वैशाली सूर्यवंशी, प्रदेश पदाधिकारी अजय भोळे, सुरेश धनके, अशोक कांडेलकर, मार्केटिंग फेडरेशनचे रोहीत निकम, पोपटतात्या भोळे, राजेंद्र घुगे, जिल्हा संघटन महामंत्री राजेंद्र सोनवणे, कार्यालय मंत्री गणेश माळी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्नेहल विसपुते यांच्या समवेत उपस्थितांनी सामुहिक वंदे मातरम् गीत म्हटले.

मंत्री गिरीश महाजन पुढे म्हणाले की, देशावर जेव्हा ब्रिटीशांचे राज्य होते, तेव्हा स्वांतत्र्य मिळण्याचे स्वप्न अनेक क्रांतिकारकांनी पाहिले होते. या स्वप्नांमध्ये स्फुरण भरण्यासाठी बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम् हे गीत लिहीले. भारतमातेचे वर्णन करणार्‍या या गीताने स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठी भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. शिरीषकुमारसारख्या बालकाने छातीवर गोळ्या झेलल्या. आज अशा क्रांतीकारकांच्या बलिदानामुळेच आपण मोकळा श्वास घेऊ शकतो.

त्यामुळे प्रत्येकाने या राष्ट्रगीताचा सन्मान हा राखलाच पाहिजे. भारतभूमी ही काही जमीन नाही तर ती आपली माता आहे. या मातेचे सुरेख वर्णन करणार्‍या या वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे ना. गिरीश महाजन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे. ११ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकावर आली आहे. २०४७ पर्यंत भारत हा विश्वगुरू होईल. देशात फायटर जेट, बुलेट ट्रेन, वंदे भारत ट्रेन अशा सुपरफास्ट सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सगळ्याच क्षेत्रात देशाची प्रगती होत आहे. त्यामुळे देशाप्रती आपल्याला आदर असलाच पाहीजे असेही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

वंदे मातरम् हे गीत उर्जा देणारे – ना. सावकारे
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की, वंदे मातरम् हे गीत स्वातंत्र्याला नवी दिशा देणारे ठरले आहे. शालेय जीवनापासून आपण हे गीत म्हणत आलो आहे. त्यामुळे हे गीत म्हणजे राष्ट्राप्रती आणि मातृभूमीप्रती एक आदराची भावना असल्याचे ना. संजय सावकारे यांनी सांगितले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणावर वंदे मातरम् या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सामुहिक वंदे मातरम् गीत म्हटले गेले. कार्यक्रमाला उपस्थित तीन हजाराहून अधिक विद्यार्थी आणि मान्यवरांकडून गीत सादर होतांना राष्ट्रचेतना जागृत झाल्याचा प्रत्यय आला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपाचे जळगाव पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन प्रशांत सोळंके, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके, फिजीओथेरेपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.एच. पाटील, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गणवीर, वैद्यकीय रूग्णालयाचे सीईओ विजय बाविस्कर, राहुल गिरी, प्रवीण कोल्हे, आयुर्वेद महाविद्यालयाचे डीन वैद्य हर्षल बोरोले, चेतन चौधरी, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक चौधरी, शैलेश तायडे, डॉ. पी.आर सपकाळे, होमीओपॅथी महाविद्यालयाचे रजीस्ट्रार राजू जामोदकर, रूग्णालयाचे प्रशासन अधिकारी आशिष भिरूड यांच्या महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button