Other
अमळनेर शहरात महावितरणचा कारभार वाऱ्यावर!

अमळनेर: पंकज शेटे –
⚡अमळनेर शहरातील महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे शॉक लागून बकरीचा मृत्यू, मोठी जीवितहानी टळली, नागरिकांचा महावितरण कर्मचाऱ्यांना घेराव.
अमळनेर शहरात महावितरणचा भोंगळ कारभार जपान जिन येथील श्री आसन रंगरेज याच्या घराला लागून असलेला खांब नंबर 907 ला लागून बकरी मृत्यूमुखी पडली असून त्या भागात लहान मुलं मुली मोठ्या प्रमाणात खेळत असतात त्या भागात मोठी जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असत असा प्रश्न तेथील नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे तसेच बकरीला अमळनेर पशूवैद्यकीय दवाखान्यात घेऊन गेले असता दवाखाना बंद होता
यावेळी त्या भागातील नागरिक इम्रान शेख कायुम,अजहर अली, अफजल शेख, तोसीफ पठाण, कमिल शेख, मोबीन शेख, आवेश शेख, कमल, सोहेल त्या परिसरातील नागरिक उपस्थित होते.