वक्फ कायदा विरोधात जळगावात ठिय्या आंदोलनात हजारो लोकांची उपस्थिती

वक्फ कायदा विरोधात जळगावात ठिय्या आंदोलनात हजारो लोकांची उपस्थिती
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड द्वारे १० एप्रिल ते ७ जुलै कायदा २०२५ ला विरोध करण्यासाठी लोकशाही मार्गाने विविध प्रकारे उपोषण, आंदोलन, साखळी उपोषण, जेलभरो, रस्ता रोको, प्रेस कॉन्फरन्स, जाहीर सभा इत्यादी प्रकारे विरोध
दर्शवून महामाहिम राष्ट्रपतीला निवेदन देण्याच्या सूचना प्राप्त झाल्याने जळगावातील वक्फ बचाव समितीतर्फे शुक्रवारी दुपारी ४ ते ५ या वेळात ठिय्या आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर करण्यात आले असून यात हजारोच्या संख्येने लोकांनी उपस्थिती देऊन वक्फ कायदा विरोधात घोषणा दिल्या.
वक्फ कायदा विषयी माहिती
सर्वप्रथम फारुक शेख यांनी असंवैधानिक वक्फ उम्मीद कायद्याविषयी माहिती विशद केली व या आंदोलनाचे प्रास्ताविक सादर केले.
मुफ्ती खालीद सह मुफ्ती रमिज , सईद देशमुख, मौलाना तोफिक शाह, मौलाना ओसामा इलाही, मौलाना कासिम नदवी यांनी उपस्थितांना कायदा कसा विरोधात आहे हे विषद करून लोकशाही मार्गाने आंदोलन का करण्यात येत आहे याची संकल्पना सादर केली.
महामाहिम राष्ट्रपतीला निवेदन
या आंदोलन संपल्यानंतर राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले त्यात व बिलाला लोकसभा राज्यसभा मध्ये खासदारांनी विरोध दर्शविला, ऑन लाइन व लेखी निवेदने व तक्रार सादर केले तरीसुद्धा शासनाने
असंविधानिक कायद्याला मान्यता दिल्याने तो कायदा त्वरित रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
सदर मागणीचे निवेदन मुफ्ती खालिद यांच्या हस्ते देण्यात आले त्यांच्यासोबत मुफ्ती रमिज, मौलाना तौफिक शहा, मौलाना कासिम , फारूक शेख, नदीम मलिक, अमजद पठाण अन्वर खान, मजहर खान, मतीन पटेल अनिस शहा आदींची उपस्थिती होती.
ठिय्या आंदोलनात स्वेच्छेने लोक रस्त्यावर
या आंदोलन साठी अपेक्षित लोकांच्या संख्येपेक्षा मोठ्या प्रमाणात लोक आल्याने लोकांच्या मनात वक्फ कायद्याविषयी असंतोष निर्माण झाल्याचे दिसून आले. आंदोलन संपतेपर्यंत गर्दी जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर जमत होती. पुढील आंदोलनाला उपस्थितिचे आवाहन आयोजकांनी केले.
आंदोलनाची सांगता दुवाने
या आंदोलनाची सांगता मुफ्ती रामिज च्या दुवाने झाली तेव्हा उपस्थित जनसमुदायाने अमीन बोलून ईश्वराकडे मान्यतेसाठी साकडे घातले.
ठिय्याआंदोलनाला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्वांची उपस्थिती
या आंदोलनात धर्मगुरू अख्तर नदवी, मौलाना शफिक पटेल, मौलाना उमेर ,हाफिज रहीम,मुख्तार पटेल, हाफिज वसीम पटेल,राजकीय क्षेत्रातील नदीम मलिक, अमजद पठाण, सलिम इनामदार, मजहर पठाण, सय्यद इमरान, अँड सलीम शेख, धार्मिक संघटना चे कूल जमाती सैयद चांद, वहीदत तर्फे डॉक्टर जावेद, आय वाय तर्फे आहेसान असलम, जमात ए इस्लामी तर्फे आरिफ देशमुख व आदिल खान, एस आई ओ तर्फे रय्यान बागवान व सद्दाम पटेल, सामाजिक संघटनांचे शरीफ बाबा, जफर मिर्झा,अफजल जनाब, नदीम शेख, इब्राहिम भाई , मुनीर सर, कासिम उमर शेख , अनिस शहा, अन्वर खान, ताहेर शेख, युसुफ बुलेट, रेहान पिंजारी ,मतीन पटेल, मुन्ना शेख , मुजफ्फर शेख, रफिक शेख आदींची उपस्थिती होती