CrimeSocial

जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा

जळगाव जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून रेड अलर्ट चा इशारा

अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता सतर्कतेचे आवाहन
जळगाव | प्रतिनिधी हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून काही भागांत अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी दुपारी हवामान विभागाने दिलेल्या तातडीच्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः निचऱ्याच्या भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका असून शेतकरी, वाहनचालक, शहर व ग्रामीण भागातील रहिवाशांनी विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क असून आपत्कालीन स्थितींसाठी मदत केंद्रांसह नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button