खळबळजनक : सासरच्यांनी विवाहितेला तिसऱ्या माळ्यावरून फेकले
महा पोलीस न्यूज | ९ मार्च २०२४ | जागतिक महिला दिनाला एक दिवस उलटत नाही तोच जळगाव शहरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या फ्लॅटच्या गॅलरीतून विवाहितेला खाली फेकण्यात आले आहे. दरम्यान, विवाहितेला सासरच्या मंडळींनी फेकल्याचा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबियांनी केला असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेवर जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. नसरीन वसीम पिंजारी वय – ३० असे जखमी विवाहितेचे नाव आहे.
जखमी विवाहितेचे वडील निसार रज्जाक पिंजारी रा.रनाळा, ता.नंदुरबार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझी मुलगी नामे नसरीन वय-३० वर्षे हिचा मागील तीन वर्षापुर्वी जळगांव येथील इसम नामे वसीम छोटु पिंजारी यांचेसोबत निकाह (दुसरे विवाह) केला आहे. तीला फातीमा वसीम पिंजारी नावाची १ वर्षाची मुलगी आहे. माझी मुलगी नसरीन वसीम पिंजारी हिस तीचे निकाह नंतर सासरच्या लोकांनी काही दिवस म्हणजेच सुमारे १ वर्षापर्यंत व्यवस्थीत वागवले व त्यानंतर तीला सासरकडील, पती, सासु, सासरे, ननंद, यांचेकडुन त्रास दिला जावु लागला. माझ्या मुलीने आमच्याकडुन (माहेरुन धान्य, पैसे) आणावे याकरीता तीला नेहमी मारहाण करुन, शिवीगाळ करुन त्रास दिला जात असे. मागील एक वर्षापासुन सुमारे ४ वेळा तीला मारहाण केल्यामुळे ती माहेरी निघुन आलेली होती. परंतु तीची मुलीची जात असल्याकारणाने तीचे सासरच्या लोकांविरोधात आम्ही काहीएक तक्रार न करता, मी तीला स्वतः माझ्याच मुलीला समजावुन पुन्हा नांदण्यासाठी सासरी पोहचविण्यासाठी जात होतो.
मागील सुमारे ६ महिन्यांपूर्वी असेच माझ्या मुलीस तीचे सासरच्यांनी तीचेकडून तीने माहेरुन पैसे, धान्य आणावे अशी मागणी केली होती. परंतु तीने आमचेकडुन पैसे व धान्य आणन्यास नकार दिल्यामुळे सासु व पतीने तीला मारहाण केली होती. त्यानंतर तीला तीचे पतीने (माझ्या जावायाने) दोंडाईचापर्यंत रेल्वेने सोडले व तेथुन माझा मुलगा अफजल याने तीला घरी आणले तेव्हा तीचा चेहरा सुजलेला होता. त्यावेळी तीला आम्ही विचारणा केली असता, तीने आम्हाला सांगीतले की, माझे सासरचे पती, सासु म्हणतात की, तुझ्या वडिलांची चांगली शेती आहे. तुझा भाऊ चांगला वेल्डींगचा व्यवसाय करतो. आपल्यालाही चांगला व्यवसाय उभा करायचा आहे. म्हणुन माहेरुन १ लाख रुपये आण असा तगादा लावला होता त्याकरीता तीने नकार दिल्यामुळे तीस सासु व पतीने मारहाण केली होती असे तीने आम्हाला सांगीतले होते. त्यानंतर तीला आम्ही आमच्या गावातीलच चौधरी डॉक्टरांकडे उपचार केल होते. व ती माहेरीच होती.
मागील सुमारे एक ते दिड महीन्यापूर्वी माझी मुलगी माहेरी असतांना मला म्हणाली की मला नांदायला सासरी जायचे आहे. म्हणून मी तसेच माझा मोठा मुलगा अमीर निसार पिंजारी असे तीला पोहोचवायला जळगावला आलो होतो. तेव्हाही आमचेसोबत तीचा सासरा, सासु, व पतीने आमच्याशी वाद घातला होता. परंतु त्यांचे घराचे शेजारी राहणारी मनिषा निकम नावाची महीलेने आमच्यात मध्यस्थी करुन वाद मिटवला व आम्ही मुलीस नांदायला सोडुन गेलो होतो.
काल दिनांक ८ मार्च रोजी दुपारी सुमारे ४ वाजता माझे व्याहीचे मोबाईलवरुन शेजारी राहणाऱ्या मनिषा निकम यांनी माझ्या फोनवर फोन केला होता. व त्यांनी सांगीतले की, तुमच्या मुलीचे व तीचे सासरचे लोकांमध्ये भांडणे होत आहेत. त्यानंतर तो फोन माझी मुलगी नसरीनकडे दिला असता तीने मला फोनवर सांगीतले की, मला माहेरी घेवुन चला हे लोक मला मारुन टाकतील, तसेच माझ्या फातीमालाही पडल्यामुळे जखम झाली आहे. अशी ती म्हणाली होती. तेव्हा मी तीला सांगीतले की मी आज येवु शकत नाही वेळ झाला आहे. मी उदया येईल असे सांगुन फोन ठेवला होता.
आज दिनांक ९ मार्च रोजी सकाळी १० वजता माझ्या व्याहीच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता, त्यावर माझे व्याही न बोलता शेजारी राहणारे मनिषा निकम बोलल्या की, तुमची मुलगी कपडे धुतांना खाली पडली आहे. व फोन कट झाल. त्यानंतर मी त्या मोबाईल नंबरवर वारंवार फोन केला असता. फोन रिसीव्ह झाला नाही म्हणुन मी तसेच माझे दोन्ही मुले व पत्नी तसेच इतर नातेवाईक असे जळगाव येथे येण्यासाठी निघालो व आम्ही दुपारी ४ वाजता जळगांव येथे माझ्या मुलीच्या माहेरी पोहचलो.
मुलीच्या सासरी घरी तीची ननंद करीष्मा अकील पिंजारी व तीची सासु हसीना छोटु पिंजारी असे घरी होते. त्यांना आम्ही विचारणा केली असता, त्यांनी सांगीतले की, सकाळी सुमारे ८ वाजता ती बिल्डींगमधील घराच्या
गॅलरीमधुन खाली पडली आहे. तीला सिव्हील हॉस्पीटल जळगांव येथे उपचार कामी दाखल केले आहे. म्हणुन आम्ही सिव्हील हॉस्पीटल येथे जावुन माझ्या मुलीची उपचारादरम्यान पाहणी केली.
माझ्या मुलीचे दोन्ही पाय व उजवा हात फॅक्चर असुन, पोटाला अंतर्गत दुखापत झाली असल्याचे डॉक्टरांनी कळविले. तसेच छात्तीला मुक्का मार लागला आहे. तीचेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असुन ती बोलण्याचे स्थीतीत नाही. म्हणुन तीचेसोबत बोलणे झाले नाही. त्यानंतर आम्ही पुन्हा ती ज्या ठिकाणाहुन पडली त्या ठिकाणी त्यांचे घरी जावुन पाहणी केली असता, बिल्डींगच्या तिसऱ्या मजल्यावर, सुमारे ३ ते ३.५ फुट उंचीचा कठडा असुन त्या ठिकाणाहुन काम करता-करता ती सहज पडु शकत नाही.
मागील अनेक दिवसापासुन तीला तीचे पती- वसीम छोटु पिंजारी, सासर-छोटु उमर पिंजार, सासु-हसीना छोटु पिंजारी ननंद करिष्मा अकिल पिंजारी हे त्रास देत असुन आज रोजी माझ्या मुलीसोबत घडलेली घटना ही ती स्वतः तिसऱ्या मजल्यावरुन पडली नसून, तीला या चौघांनी मिळून तीला मारहाण करुन तीला जीवे ठार मारण्याचे उददेशाने तीला राहते घराचे बिल्डींगचे गॅलरीमधुन जीवे ठार मारण्याच्या हेतुन खाली ढकलुन दिले आहे. त्यामध्ये माझी मुलगी गंभीर जखमी झाली आहे म्हणुन माझी तीचे पती वसीम छोटु पिंजारी, सासरा छोटु उमर पिंजारी, सासु हसीना छोटु पिंजारी, ननंद करिष्मा अकिल पिंजारी यांचे विरोधात कायदेशीर फिर्याद आहे.
जखमी नसरीन हिच्यावर सध्या उपचार सुरू असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहेत. गुन्ह्यात पोलिसांनी पती वसीम छोटु पिंजारी, सासु हसीना छोटु पिंजारी, ननंद करिष्मा अकिल पिंजारी यांना अटक केली आहे.