Other

ब्रेकिंग : रिक्षात बसलेल्या वृद्धेची २५ ग्रॅमची मंगलपोत लांबवली

महा पोलीस न्यूज । दि.३ जून २०२५ । जळगाव शहरातील नवीन बस स्थानक येथून नवीपेठेतील एका ज्वेलर्सच्या दुकानात येण्यासाठी ६५ वर्षीय महिला रिक्षात बसली होती. रिक्षातील एका अनोळखी महिलेने संधी साधून महिलेच्या पर्समधून २५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत लंपास केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री येथील सुशिला नगर भागात राहणाऱ्या लिलाबाई ताराचंदजी ताटीया वय ६५ वर्ष या माहेरी जळके येथे आलेल्या होत्या. मंगळवार दि.३ रोजी त्या सकाळी १० वाजता बसने जळगाव स्थानकावर आल्या. गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची मंगल पोत तुटलेली असल्याने ती जोडण्यासाठी त्या बहीण प्रेमलता चोपडा आणि वहीणी संगिता जैन यांच्यासह रिक्षाने महावीर ज्वेलर्स नवीपेठ येथे येण्यासाठी निघाल्या होत्या.

बस स्टॅण्डवरील रिक्षात त्यांच्यासह एक अनोळखी महिला देखील बसली होती. महावीर ज्वेलर्स येथे रिक्षामधुन उतरल्यानंतर दुकानात गेल्यावर त्यांनी पर्स पाहीली असता पर्सची चैन उघडी होती. पर्समधील सोन्याची पोत पाहीली असता त्यांना पोत मिळुन आली नाही.याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार वीरेंद्र शिंदे करीत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button