अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमाला मुद्देमालासह अटक ; उमरखेड पोलिसांची कारवाई

अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या इसमाला मुद्देमालासह अटक ; उमरखेड पोलिसांची कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी
शहरातील उमरखेड परिसरातील रहीम नगर भागात एकाला गांजा विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या इसमाला उमरखेड पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक किलो 196g गांजा जप्त करण्यात आला आहे,
पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिलेल्या आदेशानुसार अवैध धंदे, यासह अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. उमरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
यांना मिळालेल्या माहितीनुसार 13 फेब्रुवारी रोजी गुन्हे शोध पथकाने उमरखेड येथील रहीम नगर विटगावकडे एका पिशवीत अवैधरीत्या गांजा विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या इब्राहिम खान पीर खान याला एक किलो 196g गांजा सह पोलिसांनी अटक केली.
त्याच्याविरुद्ध आमंली औषधी मनप्रभावी पदार्थ अधिनियम चे कलम 8 (क), 20 (ब), (2), (ब) अन्वये अपराध क्र. 91/2025 प्रमाणे पोलीस स्टेशन उमरखेड येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
सदर कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड उमरखेड, ठाणेदार पोलीस निरीक्षक, श शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे संदीप ठाकूर दिनेश चव्हाण संघशील टेंबरे निवृत्ती महानाळ पोलीस कॉन्स्टेबल गुसे महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा इंगळे चालक समीर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.