Other

बलात्कार प्रकरणातील अज्ञात आरोपी 24 तासांत जेरबंद

 बलात्कार प्रकरणातील अज्ञात आरोपी 24 तासांत जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई

यवतमाळ प्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांत निष्पन्न करून अटक केली. या यशस्वी कारवाईमुळे गुन्हा उघडकीस आला असून, आरोपीला पुढील तपासासाठी अवधूतवाडी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.27 मे 2025 रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक 844/2025 अंतर्गत कलम 137(2), 64(1), 351(2), आणि 75 भा.दं.वि.सं.नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल झाली होती.

पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ, पीडित मुलीच्या राहत्या परिसरातील आणि नागपूर रोडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा वाहनाचा (क्रमांक MH-29 AR-4579) वापर झाल्याचे आढळले.

गोपनीय माहितीच्या आधारे किन्ही गावातील खासगी चालक आशिष गुलाबराव तलमले (वय 39, रा. किन्ही, ता. जि. यवतमाळ) याने हा गुन्हा केल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पीडितेने फिर्यादीत नमूद केलेल्या घटनाक्रमाशी त्याची कबुली जुळल्याने त्याला अटक करण्यात आली.आरोपी आशिष तलमले याला पुढील तपासासाठी अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, पोलीस निरीक्षक सतीश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा), आणि पोलीस निरीक्षक नरेश रणधीर (अवधूतवाडी) यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडली गेली. कारवाईत पोउपनि गजानन राजमल्लू, सै. साजिद, रुपेश पाली, योगेश डंगवार, प्रशांत हेडाउ, आकाश सूर्यवंशी, आणि देवेंद्र होले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button