धक्कादायक: कंटेनरमधून ६० गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक ; तिघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत तब्बल ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

धक्कादायक: कंटेनरमधून ६० गोवंशांची कत्तलीसाठी वाहतूक ; तिघांना अटक
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत तब्बल ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने गोवंश तस्करीचा पर्दाफाश केला आहे. एका कंटेनर वाहनातून कत्तलीसाठी हैद्राबाद येथे घेऊन जाण्यात येणारे ६० बैल ताब्यात घेण्यात आले असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एकूण ४५,०५,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
१७ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, नागपूर मार्गे पांढरकवडामार्गे गोवंशांची अवैध वाहतूक होत आहे. यानंतर, पथकाने पिंपरी गावाजवळ सापळा रचून संशयित कंटेनर अडवला.
वाहनाची तपासणी केल्यावर त्यामध्ये ६० बैल निर्दयीपणे कोंबलेले आढळले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत वाहनातील आरोपी संतोष भरलाल लोधा (वय ५९, रा. फुलपुरा, ता. सारंगपूर, जि. राजगड, मध्यप्रदेश),मशीद अली रशीद अली (वय २८, रा. दांडीयावाडी, ता. सारंगपूर, जि. राजगड, मध्यप्रदेश), शाकीर अली अमानत अली (वय ५०, रा. दांडीयावाडी, ता. सारंगपूर, जि. राजगड, मध्यप्रदेश)यांना अटक करण्यात आली आहे.तिघा आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
६० गोवंश (बैल) १५ लाख रुपये , कंटेनर वाहन – ३० लाख रुपये ३ मोबाईल ३,००० रुपये ,रोख रक्कम २,२०० रुपये
असा एकूण मुद्देमाल ४५ लाख ५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यांनी केली कारवाई
यवतमाळ पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आणि स्था. गु. शाखा निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनिधनराज हाके, अंमलदार सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके आदींनी केली. या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यात गोवंश तस्करीवर आळा बसणार असून, पोलिसांच्या जलद कारवाईचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. यापुढेही अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.