Politics

चाळीसगाव नगरपरिषदेत भाजपाचा झेंडा

चाळीसगाव नगरपरिषदेत भाजपाचा झेंडा

नगराध्यक्षपदी प्रतिभा चव्हाण ; ६,०१२ मतांनी दणदणीत विजय

चाळीसगाव प्रतिनिधी : चाळीसगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध करत नगराध्यक्षपदावर मोठा विजय नोंदवला आहे. भाजपाच्या उमेदवार प्रतिभा चव्हाण यांनी तब्बल ६,०१२ मतांच्या फरकाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत नगराध्यक्षपद पटकावले. या निकालामुळे चाळीसगावच्या राजकारणात भाजपाची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिभा चव्हाण यांना एकूण ३२,२३८ मते मिळाली. शहर विकास आघाडीच्या पद्मजा देशमुख यांना २६,२२६ मते मिळाल्याने त्यांना पराभव स्वीकारावा लागला. अन्य उमेदवारांमध्ये राहुल जाधव यांना ४३४, तर समाधान पाटील यांना ३५३ मते मिळाली.

प्रभागनिहाय निकालात भाजप आघाडीवर

नगराध्यक्षपदासह प्रभागनिहाय निकालातही भाजपाने बहुसंख्य जागांवर विजय मिळवत आपले संख्याबळ वाढवले.

प्रभाग क्रमांक १-अ मधून भाजपाचे करणसिंग राजपूत (मतं २,२४६, फरक ३८१) विजयी झाले, तर १-ब मधून मनीषा शेखर पाटील (२,२६६ मते, फरक २८१) यांनी बाजी मारली.

प्रभाग २-अ मधून शहर विकास आघाडीचे राहुल म्हस्के (१,३८० मते) आणि २-ब मधून वैशाली पाटील मोरे (१,५३७ मते) विजयी झाले.

प्रभाग ३-अ मधून दीपक पाटील (शहर विकास आघाडी) यांनी अवघ्या ३५ मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर ३-ब मधून भाजपाच्या स्वाती शिरुडे (१,७१६ मते) यांनी मोठी आघाडी घेतली.

प्रभाग ४-अ मधून भाजपाचे हर्षल चौधरी (२,२८६ मते, फरक १,६९९) आणि ४-ब मधून प्राजक्ता कोठावदे (१,८५७ मते) विजयी झाल्या.

प्रभाग ५-अ मधून रूपाली प्रभाकर चौधरी (२,६९० मते) व ५-ब मधून युवराज भीमराव जाधव (१,७७८ मते) यांनी भाजपाचे खाते वाढवले.

प्रभाग ६-अ मधून योगेश खंडेलवाल, तर ६-ब मधून योजना धनंजय पाटील यांनी भाजपासाठी विजय मिळवला.

प्रभाग ७-अ मधून शहर विकास आघाडीच्या स्वाती राखुंडे, तर ७-ब मधून अपक्ष राजेंद्र चौधरी विजयी झाले.

प्रभाग ८-अ मधून पायल विशाल कारडा, तर ८-ब मधून सोमसिंग देवसिंग राजपूत यांनी भाजपाला यश मिळवून दिले.

प्रभाग ९-अ मधून शहर विकास आघाडीच्या विजया प्रकाश पवार, तर ९-ब मधून पूनम धनंजय अहिरे विजयी ठरल्या.

प्रभाग १०-अ मधून भारती प्रवीण मराठे आणि १०-ब मधून संभाजी शिवाजी गवळी यांनी भाजपाची बाजू भक्कम केली.

प्रभाग ११-अ मधून हर्षदा बाळू पवार, तर ११-ब मधून अभय विनायक वाघ विजयी झाले.

प्रभाग १२-अ मधून अनिल वाल्मिक चौधरी, तर १२-ब मधून अपक्ष सायली रोशन जाधव यांनी विजय मिळवला.

प्रभाग १३-अ मधून फकिरा बेग मिर्झा, तर १३-ब मधून मेघा मुकेश चौधरी यांनी भाजपाचा झेंडा फडकवला.

प्रभाग १४-अ मधून शहर विकास आघाडीचे इमरान शेख, तर १४-ब मधून भाजपाच्या रुबीना अमजद खान विजयी ठरल्या.

प्रभाग १५-अ मधून वसीम रज्जाक शेख, तर १५-ब मधून नलिनी अमोल चौधरी यांनी भाजपासाठी यश संपादन केले.

प्रभाग १६-अ मधून शहर विकास आघाडीचे अभिषेक देशमुख, तर १६-ब मधून राजश्री दीपक राजपूत विजयी झाले.

प्रभाग १७-अ मधून उज्वला विशाल राजपूत आणि १७-ब मधून प्रशांत शामराव कुमावत यांनी भाजपाचा विजय निश्चित केला.

प्रभाग १८-अ मधून धर्मा अनिल बच्चे (भाजपा), तर १८-ब मधून शहर विकास आघाडीच्या सविता सूर्यकांत ठाकूर विजयी झाल्या.

अंतिम जागावाटप

चाळीसगाव नगरपरिषदेत एकूण ३६ जागांपैकी
भाजपा – २४,
शहर विकास आघाडी – १०,
अपक्ष – २
असे संख्याबळ स्पष्ट झाले आहे.

या निकालामुळे चाळीसगाव नगरपरिषदेत भाजपाची सत्ता भक्कम झाली असून, नगराध्यक्षपदासह बहुसंख्य प्रभागांवर मिळालेल्या विजयामुळे आगामी काळात शहराच्या कारभारावर भाजपाचा प्रभाव राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button