उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली

जळगाव l- केसीई सोसायटीचे मुळजी जेठा महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भारंबे, श्री शशिकांत वडोदकर (सांस्कृतिक समन्वयक कांन्ह ललित कला) केंद्र,प्रा.प्रसाद देसाई,योगशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.देवानंद सोनार, फाईन आर्ट विभागाचे प्रमुख श्री.मिलिंद भामरे,श्री प्रसाद कासार उपस्थित होते.
स्वरदा संगीत विभाग प्रमुख प्रा.कपिल शिंगाने,प्रा.देवेंद्र गुरव यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण नियोजन केले होते.
स्वरदा संगीत विभाग आणि कांन्ह ललित कला केंद्रचे विद्यार्थी उपस्थित होते..
या कार्यक्रमाच्या वेळी कान्ह ललित कला केंद्र येथील संचालक श्री शशिकांत वडोदकर हे झाकीर हुसेनांविषयी दोन शब्द बोलले आणि तबला वादक विद्यार्थी कुमार मानस नाईक यांने उस्ताद झाकीर हुसेन यांचा जीवन परिचय दिला व त्यांची संपूर्ण जीवन परिचय सांगितला.