जळगाव जिल्हा परिषदेच्या महिला तक्रार निवारण समितीची स्थापना ; अशासकीय सदस्यपदी सुरज नारखेडे
जळगाव – प्रतिनिधी – जळगाव जिल्हा परिषदेच्या महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून मानवअधिकार परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरज नारखेडे यांची प्रशासकीय सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय दि. १९ जून २०१४ अन्वये जिल्हा परिषद कार्यालयातील महिला कर्मचारी यांच्या तक्रार समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेतील महिला कर्मचा-यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत सुचित केलेले आहे. त्यानुषंगाने जळगाव जिल्हा परिषदेमधील महिला कर्मचाऱ्यांचे तक्रारी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी संदर्भ क ३ अन्वये महिला तक्रार निवारण समिती अर्थ विभाग जि.प. जळगांव, या कार्यालयासाठी तक्रार समिती गठीत करण्यात आली आहे. यात अध्यक्ष पदी दिपाली भानुदास बोरोले वरिष्ठ, सहा (अर्थ विभाग), सदस्य लता मुरलीधर पाटील वरिष्ठ, सहा (अर्थ विभाग), तर जनाई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मानवधिकार परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुरज विजय नारखेडे यांची अशासकिय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदस्य सचिव विनोद चावरिया उ.प.मु. ले.वि.अ अर्थ विभाग जि.प. जळगांव यांचा समावेश आहे. या समितीने पुढील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करावी, असे आदेशात नमूद केले आहे.
या समितीने जिल्हा परिषदे अंतर्गत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची दखल घेवुन त्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाय योजना योजून करून कार्यवाही करावी. सदरच्या समितीने तक्रार निवारण्याच्या संदर्भात केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा जळगाव जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे समितीच्या अध्यक्षा यांनी सादर करावा. तक्रार निवारण कक्षाची मिटींग समिती अध्यक्ष यांचे कक्षात घेण्यात यावी. दरमहा घेणाऱ्या समितीने इतिवृत्त समितीच्या अध्यक्षांनी प्रकाशित करावे, या समितीची निवड पुढील आदेश होईपावेतो करण्यात येत आहे. तक्रार निवारणसंदर्भात शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.सदरच्या समिती तात्काळ कार्यान्वीत करण्यात येवुन शासन नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी ,असे पत्र जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील यांनी दिले आहे.