Social

दसऱ्यापूर्वी सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने ११ कोटींचे निवृत्ती वेतन थेट खात्यात

दसऱ्यापूर्वी सीईओ मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने ११ कोटींचे निवृत्ती वेतन थेट खात्यात

जळगाव (प्रतिनिधी) – दसऱ्याच्या आनंददायी वातावरणात जळगाव जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मीनल करनवाल यांच्या पुढाकाराने तब्बल ४,२४९ सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०२५ चे निवृत्ती वेतन – एकूण ११ कोटी ५ लाख ९९७ रुपये – १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता थेट त्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले.

सीईओ करनवाल यांनी यासाठी आधीच अर्थ विभागाला स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पेन्शन शाखेने तालुकास्तरावरून माहिती संकलन करून तपासणी केली व शासकीय प्रणालीद्वारे नियमानुसार रक्कम खात्यात जमा केली.

या उपक्रमामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनाला आधार मिळाला असून, जिल्हा परिषदेचे कामकाज वेगवान व पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

या यशस्वी कार्यवाहीसाठी सीईओ मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य लेखा व वित्त अधिकारी विनोद चावरीया, सहाय्यक लेखाधिकारी निशीथ शर्मा, कनिष्ठ लेखाधिकारी गुलाबराव पाटील, वरिष्ठ सहाय्यक सुमेध जाधव तसेच तालुकास्तरावरील कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वेळेत मिळालेल्या या निवृत्ती वेतनामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, सीईओ मीनल करनवाल यांच्या या दूरदृष्टीपूर्ण निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button