अखेर मुक्ताईनगर शहरातुन होणारी अवजड वाहतुक वळवली;शहरवासीयांमध्ये समाधान

अखेर मुक्ताईनगर शहरातुन होणारी अवजड वाहतुक वळवली;शहरवासीयांमध्ये समाधान
महा पोलीस न्युज सुभाष धाडे |
मुक्ताईनगर शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्यावरुन अवजड वाहतुक मोठ्या प्रमाणावर वाढली होती. इंदौर,औरंगाबाद,जळगाव,धुळे तसेच विदर्भासह इतर राज्यात जाणारे मालट्रक,कंटेनर यासह अवजड वाहनांची वर्दळ वाढली होती.परीणामी रस्त्याचा वापर करतांना शहरवासीयांना जीव मुठीत घ्यावा लागत होता. तसेच तालुक्याला येणारे शालेय विद्यार्थी नागरीक यांनासुद्धा खुप त्रास व मनस्ताप सहन करावा लागत होता. अवजड वाहतुकीमुळे वाहतुकीची कोंडी होत होती. पुर्वी अनेक अपघात घडले असुन काहींचा बळी पण गेला आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी प्रशासनास प्राप्त झाल्या याशिवाय पत्रकारांनीसुद्धा या विषयास अनुसरुन वृत्त प्रसारित केल्याने अखेर प्रशासनाकडुन दखल घेतली गेली. शहरातुन सूरु असलेली अवजड वाहतुन पुर्णपणे बंद करुन शहराबाहेरुन म्हणजेच पुरनाड फाट्यापासुन डोलारखेडा फाटा- कुंड गाव मार्गे हायवे अशी वळती केली. अवजड वाहतुक वळविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडुन दोन पोलीस कर्मचारी शहरातील बोदवड चौफुली व दोन कर्मचारी पुरनाड फाटा येथे नियुक्त करण्यात आले असल्याची माहीती पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी दिली.