दोधवद येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव ; लोकनाट्य तमाशांनी रंगणार माहोल

दोधवद येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त यात्रोत्सव ; लोकनाट्य तमाशांनी रंगणार माहोल
दोधवद ता. अमळनेर प्रतिनिधी – दोधवद येथे १ऑक्टोबर रोजी शारदीय नवरात्री नवमी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नवरात्र उत्सवा निमित्त ही जत्रा गावाची पुरातन परंपरा असून दरवर्षी भाविक आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यात्रेचा माहोल रंगतो.
परंपरेनुसार नवरात्री च्या 9 व्या (नवमी) दिवशी भगत गण नाचतात तसेच बाहेर गावाहून आलेले चाकरमाने मोठ्या उत्साहात यात्रेचा आनंद घेत असतात.
यात्रेतील प्रमुख आकर्षण म्हणून लोकनाट्य तमाशा मंडळांचे प्रयोग रंगणार आहेत. मनोरंजनाबरोबरच पाळणे, झुले, फरसाण व खाद्यपदार्थांची दुकाने, गोडधोड व खेळणी स्टॉल्स यात्रेची रंगत वाढवणार असून परिसरात खरेदी-विक्रीचा गजबजलेला माहोल अनुभवायला मिळणार आहे.
शारदीय नवरात्री नवमी च्या दिवशी नवस पूर्ण करण्याची” अशी अख्यायिका आहे. यात्रेदिवशी भाविक मनोभावे देवीचे दर्शन घेऊन नवस फेडतात. त्यामुळे यंदाही यात्रेला परिसरातील नागरिक, व्यापारी आणि भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
आयोजक मंडळाने नागरिकांना व भाविकांना “श्रद्धा, परंपरा आणि उत्सवाचा संगम असलेल्या या यात्रेला उत्स्फूर्त उपस्थित राहावे” असे आवाहन केले आहे.






