कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन युवक ठार
रावेर सावदा मार्गावरील पहाटेची घटना ; दोन जण जखमी
जळगाव:-जळगाव शहरासह जिल्ह्यात अपघातांचे सत्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असून आज शुक्रवारी 20 रोजी पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात तीन युवक जागीच ठार तर दोन युवक जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सावदा रावेर मार्गावर घडली. हे युवक भुसावळ येथील हळदीचा कार्यक्रम संपवून घरी परतत होते
शुभम दशरथ सोनार (वय २५, रा. नाला परिसर, रावेर), मुकेश किशोर रायपुरकर (वय २३, रा. गांधी चौक, रावेर) आणि जयेश केशव भोई (वय २२, रा. भोईवाडा, रावेर) असे मयत युवकांची नावे आहेत. गणेश संतोष भोई (वय २७, रा. भोईवाडा), आणि विकी उदय जाधव (वय २५, रा.स्टेशन रोड, रावेर) असे जखमी युवकांची नावे आहेत.
या बाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की शुभम सोनार मुकेश रायपुरकर जयेश भाई गणेश भोई आणि विकी जाधव हे पाच युवक रावेर येथील रहिवासी असून ते भुसावळ येथे एका मित्राच्या बहिणीच्या हळदी कार्यक्रमासाठी आले असताना ते परतत असताना त्यांचे (वाहन क्रमांक एम एच 20 सी एस 80 02) ही एका झाडावर नियंत्रण सुटल्याने आज 20 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आदळली. अपघात इतका भीषण होता की कारचे सर्वत्र तुकडे विखुरले गेले. या अपघातात वरील तीन युवक मयत तर दोन युवक जखमी झाले. जखमींवर खाजगी आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेमुळे रावेर शहरात शोककळा पसरली आहे.
मयत शुभम दशरथ सोनार याला आई-वडील, तीन बहिणी असा परिवार असून तीन बहिणींच्या पाठीवरील तो एकुलता एक होता. जयेश केशव भोई याच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, एक बहीण असा परिवार आहे.
मुकेश किशोर रायपूरकर याच्या मागे आई आणि बहीण आहे .