दुचाकी चोरणारे दोघे जळगाव एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । दि.४ ऑक्टोबर २०२४ । उमाळा बसस्थानक परिसरातून चोरी झालेल्या दुचाकीच्या गुन्ह्याचा तपास करताना जळगाव एमआयडीसी पथकाने दोघांना पकडले आहे. पथकाने दोघांकडून चोरीच्या ३ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथील भुषण रमेश झांबरे हे दि.१९ सप्टेंबर रोजी दुचाकी क्रमांक एम.एच.१९.बीएल.९३३४ हे घेवुन नाष्टा करण्यासाठी उमाळा बस स्टैंड येथे आले होते. अवघ्या २० मिनीटांत फिर्यादी यांची मोटार सायकल ही चोरट्यांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय बातमी मिळाली होती कि, उमाळा येथील दुचाकी व इतर दोन मोटारसायकली कुसुंबा शिवारातील काही मुलांनी चोरी केल्या आहे. त्यांनी लागलीच पथकाला सूचना केल्या. पथकाने सतत ७ दिवस पाठपुरावा करुन माहिती काढुन संशयित पवन उर्फ भांजे गणेश पाटील वय २२ आणि निखील जयराम पाटील वय २१ वर्ष दोन्ही रा.इंदीरानगर, कुसुंबा यांना ताब्यात घेतले. दोघांचे सखोल चौकशी करता त्यांनी चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या आहेत.
या पथकाने केली कामगिरी
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, हवालदार दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, विकास सातदीवे, योगेश बारी, नितीन ठाकुर, नाना तायडे, किरण पाटील, गणेश ठाकरे, ललीत नारखेडे यांनी केली आहे.