पुण्यात क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी क्रीडा जगतातील खेळाडूंशी साधला संवाद
पुणे (प्रतिनिधी ) भारताच्या क्रीडा क्षेत्रात प्रचंड क्षमता आहे. देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी उंचीवर नेण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आपले खेळाडू हे भारताच्या उर्जेचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहेत असे प्रतिपादन क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
बालेवाडी पुणे येथे आयोजित कार्यक्रमामध्ये क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विविध क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित खेळाडू आणि प्रशिक्षकांसोबत संवाद साधला. या चर्चेत क्रीडा क्षेत्राच्या सध्याच्या स्थितीवर, येणाऱ्या आव्हानांवर, आणि सरकारच्या धोरणांवर विशेष चर्चा करण्यात आली. “कार्यक्रमादरम्यान, खेळाडूंनी त्यांच्या समस्या व सुचना मांडल्या. खेळाडूंना मार्गदर्शन करताना मंत्री महोदयांनी त्यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक करून त्यांचे मनोबल वाढवले.
कार्यक्रमाच्या शेवटी रक्षाताई खडसे यांनी क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व खेळाडूंचे आभार मानले आणि आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. श्रीमती रक्षा निखिल खडसे यांनी सांगितले की, “सरकार क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे आणि भविष्यातील योजनांवर काम सुरू आहे.
कार्यक्रमास क्रीडा आयुक्त सूरज मांढरे, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे