Social
रावेर पोलिसांकडून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

महा पोलीस न्यूज | ८ मार्च २०२४ | जागतिक महिला दिनानिमित्त रावेर पोलिसांकडून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला. पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
रावेर पोलीस स्टेशनला आज दि.८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त महिला दक्षता समिती सदस्य, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर, नर्स, महिला पोलीस पाटील, पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी, महिला होमगार्ड तसेच आर.सी.पी. पथकातील महिला कर्मचारी यांचे स्वागत करुन पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.
पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात येवून रावेर पोलीस स्टेशनला पार पडला. प्रसंगी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.