गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुससह एकाला अटक

चोपडा प्रतिनिधी ;-लासुर ते सत्रासेन रस्त्यावर एक जण गावठी पिस्तूल सह दोन जिवंत काडतूस बाळगून मिळून आल्याने त्याला अटक करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्रीमंती कावेरी कमलाकर यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की दिनांक ०१ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास लासुर ते सत्रासेन रोडवर गावठी पिस्तूल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. पोनि कावेरी कमलाकर यांनी राकेश पाटील, रावसाहेब एकनाथ पाटील, चेतन महाजन, गजानन पाटील, विनोद पवार यांच्या पथकाने नाटेश्वर मंदिरा कडे सापळा रचुन सदर इसम हे त्याचे ताब्यातील यामाहा कंपनीची मोटार सायकल क्रमांक( MHO4 EL0308) इसमाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव मनिष सुभाष जगताप रा महादेव मंदिराजवळ क्रांती चौक ता शिरपुर जि धुळे असे सांगुन त्याचे ताब्यात १ गावठी बनावट्टी कट्टा (पिस्टल) व २ जिवंतकाडतुस व एक मोटार सायकल एक मोबाईल व ३००/-रु रोख असे एकुण १,२७,३००/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला . सदर आरोपी विरुध्द गजानन पाटील यांनी फिर्याद दिले वरुन गुन्हा चोपडा ग्रामीण सी.सी.टी.एन.एस गुरनं ०१/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद पवार हे करीत आहे