Other

जळगाव जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांचा माणुसकीचा हात; दिवंगत सहकाऱ्याच्या कुटुंबाला २.६४ लाखांची मदत

जळगाव जिल्हा महसूल कर्मचाऱ्यांचा माणुसकीचा हात; दिवंगत सहकाऱ्याच्या कुटुंबाला २.६४ लाखांची मदत

​विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप 

​जळगाव (प्रतिनिधी):आपल्या सहकाऱ्याच्या कुटुंबाप्रती असलेली सामाजिक बांधिलकी जपत जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने एक आदर्श उपक्रम राबविला आहे. एरंडोल तहसील कार्यालयातील दिवंगत महसूल सहाय्यक कै. शिवाजी महाजन यांच्या अपघाती निधनानंतर, महसूल कर्मचाऱ्यांनी जमा केलेला २ लाख ६४ हजार रुपयांचा मदत निधी शनिवारी त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते हा धनादेश प्रदान करण्यात आला.


यानंतर जळगाव शहरातील कन्या छात्रालयातील एकूण 42 विद्यार्थिनींना शालेय दप्तर, वह्या, कंपास साहित्य व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा जळगाव यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. तसेच जळगाव शहरातील दानशूर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने विद्यार्थिनींना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

या कार्यक्रमास महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश्वर नन्नवरे, उपाध्यक्ष किरण बाविस्कर, कार्याध्यक्ष अतुल सानप, खजिनदार घनश्याम सानप, सरचिटणीस दिपक चौधरी, प्रसिद्धी प्रमुख गणेश हटकर, कायदेविषयक सल्लागार नम्रता नेवे, जळगाव तालुका अध्यक्ष संजय अंभोरे, ॲड. दीपक सपकाळे, भारतीय स्टेट बँकेचे गजानन पाटील, कॅनरा बँकेचे चंद्रकांत सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रदीप बाविस्कर, रितेश छाजेड तसेच व्यावसायिक सदस्य राहुल नवगिरे, महेश सपकाळे, सुरेश महाले, महेश विसपुते, सुनिल निकम, चंद्रकांत खैरे, निलेश केदार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समन्वयाची जबाबदारी जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक अमोल जुमडे यांनी पार पडली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button