तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आर.आर. विद्यालयाची विद्यार्थिनी प्रथम
जळगाव ;- जिल्ह्यातील शिरसोली येथील बारी समाज माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय येथील आज दिनांक 18 डिसेंबर रोजी आयोजित असलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्श 2024-25 यात आर.आर.विद्यालय जळगाव येथील दोन विध्यार्थीनींनी सहभाग नोंदविला होता, यात विज्ञान शिक्षक ए.एन.पाटील मॅडम व दिलीप आर पाटील सर यांनी मार्गदर्शन करत आयोजित प्रदर्शनात हजर होते.
यातील निकाल सायांकाळी 4 वाजता घोषित झाला असून या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक आर. आर.विद्यालय येथील विद्यार्थीनी अनुष्का किरण मराठे जळगाव येथील विद्यार्थिनीने पटकवला आर. आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक यु. बी.जाधव सर, शाळेतील विज्ञान शिक्षक, सर्वच शिक्षक बंधू – बघीनी, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे विशेष मार्गदर्शनासह सहकार्य मिळाले आहे, जळगाव जिल्ह्यासह जळगाव तालुक्यात सर्वतस्थरातून त्यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.