थार जीपची दुचाकीला जोरदार धडक ; पिता – पुत्र जागीच ठार

दोन जण गंभीर जखमी; बोर घाटातील भीषण घटना
रावेर : रावेर तालुक्यातील बोर घाटात सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसर हादरला. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यातील जोरदार धडकेत पिंटू बोडोले (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रितीक बोडोले यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने रावेर तालुक्यात शोककळा पसरली आहे.पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय २८), रितीक आणि आठ महिन्यांचा मुलगा टेंगुराम यांच्यासह भुसावळहून पाल गावाकडे नातेवाइकांना भेटण्यासाठी निघाले होते. रात्री बोर घाटात खेरगावच्या दिशेने भरधाव येणाऱ्या थार जीपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या अपघातात पिंटू आणि रितीक यांचा जागीच अंत झाला, तर मालुबाई आणि टेंगुराम गंभीर जखमी झाले.बोडोले कुटुंब भुसावळमध्ये मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. . या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच भाजपा रावेर पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील आणि बाळा आमोदकर यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. जखमी मालुबाई आणि टेंगुराम यांना प्राथमिक उपचारानंतर फैजपूर येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. त्यांनी शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करत त्यांना आधार दिला.पोलिसांनी थार जीप चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.