Health
गिरीशभाऊ महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे तुळशीचे रोपटे देऊन डॉक्टरांचा सन्मान

महा पोलीस न्यूज । दि.१ जुलै २०२५ । जळगाव येथील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे मंगळवार दि.१ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवसानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील विविध डॉक्टरांचे तुळशीचे रोपटे देऊन पर्यावरणपूरक सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकुर, उप अधिष्ठाता डॉ.मारुती पोटे, उप अधिष्ठाता डॉ.रमेश वासनिक, डॉ.कपिल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किरण पाटील, सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ.आकाश चौधरी, डॉ.सुशांत सुपे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्मेंद्र पाटील यांचा तुळशीचे रोपटे देऊन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे समन्वयक शिवाजी पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेला संदेश शिवाजी पाटील यांनी डॉक्टरांना वाचून दाखवला.