दिव्यांग विक्रमी रक्तदाते मुकुंद गोसावी यांचा सन्मान

जळगाव महापोलीस न्यूज l १४ मे २०२५
जळगांव – जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे सामाजिक,आरोग्य क्षेत्रात निरपेक्ष भावनेने अव्याहत सेवारत, आपल्या शारीरिक व्यंगाला परास्त करून शंभराहून अधिक वेळा रक्तदान करणारे विक्रमी रक्तदाते मुकूंद गोसावी यांचा नियमित रक्तदान शिबिर आयोजन व स्वयं रक्तदान सेवा कार्या बद्दल इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तकेंद्रा तर्फे विशेष गौरव नुकताच यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख (भा.व.से.) यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गणीभाई मेमन, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासणी जैन,विनोद बियाणी,जी. टी.महाजन, डॉ.शशिकांत गाजरे, डॉ.नरेंद्र ठाकूर यांच्या सह जिल्ह्यातील रक्तदान शिबिर आयोजक, रक्तदाते आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला.
या प्रसंगी मुकुंद गोसावी यांच्या समाजातील सकारात्मक प्रेरणादायी कार्या बद्दल मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. तर मुकुंद गोसावी यांनी आपल्या सेवाभावी मुक्ती फाउंडेशन संस्थेतर्फे गंभीर रुग्ण तसेच सीमेवरील भारतीय जवान यांच्या करिता मिशन सिन्दुर अंतर्गत पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेल्या आवाहना नुसार आपण रक्तदान शिबिर राबवणार असून नागरिक,सामजिक संस्था,राजकीय पक्षांनीही आप आपल्या स्तरावर स्वयंस्फुर्त सहभागी व्हावे अशी पत्रकान्वये आवाहन केले आहे.