राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त चाळीसगावात ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त चाळीसगावात ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन
चाळीसगाव (प्रतिनिधी) — राष्ट्राच्या एकतेचा संदेश देण्यासाठी आणि समाजात एकजुटीची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे “राष्ट्रीय एकता दिवस” निमित्त ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही मॅरेथॉन शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पहाटे ५ वाजता महाराणा प्रताप चौक येथून सुरू होणार आहे.
ही स्पर्धा एकूण ५ किलोमीटर अंतराची असून, मॅरेथॉनचा मार्ग महाराणा प्रताप चौक – मालेगाव बायपास यू-टर्न – महाराणा प्रताप चौक असा ठरविण्यात आला आहे. पुरुष व महिला अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या क्रमांकासाठी ५,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल, दुसऱ्या क्रमांकासाठी ३,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल, तर तिसऱ्या क्रमांकासाठी १,००० रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि मेडल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय, सर्व सहभागी स्पर्धकांना स्मृतिचिन्ह म्हणून टी-शर्ट देण्यात येणार आहेत.
चाळीसगाव शहरातील नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश व्यापक करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.
स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक —
भवगवान रामचंद्र पाटील : ९५११८९२७२७
दत्तात्रय हरीश्चंद्र पाटील : ९६०४९३२६७६
ही स्पर्धा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.






