Crime
दुचाकीस्वाराने धूम स्टाइल लांबविली सोनसाखळी
जळगाव : रस्त्याने पायी चालणाऱ्या एका महिलेची दुचाकी वरून आलेल्या एका भामट्याने गळ्यातून अकरा ग्रॅम वजनाची सुमारे पन्नास हजार किमतीची मंगल पोत लांबून पोवारा केल्याची घटना तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील शंभर फुटी रस्त्यावर गुरुवारी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की खेडी बुद्रुक येथे राहणाऱ्या सपना भूषण पवार या महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ११ ग्रम वजनाचे मंगलपोत जबरीने चोरुन नेली. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शंभरफुटी रस्त्यावरील हॉटेल शामबा पॅलेस समोर घडली, याप्रकरणी शनिपेठ पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.