विद्यापीठ अधिसभेत तीन नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी

विद्यापीठ अधिसभेत तीन नवीन अभ्यासक्रमांना मंजुरी
जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेची सभा शनिवार दि. २७ सप्टेंबर रोजी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत बी.एस.डब्ल्यू., एम.कॉम. आणि, बी.एस्सी. (ॲप्लाईड एन्हॉयमेंटल ॲण्ड अर्थ सायन्सेस) हे तीन नवीन अभ्यासक्रम विद्यापीठ प्रशाळांमध्ये सुरु करणे, एक वर्षीय बृहत आराखड्यास सहमती देणे व लेखा परिक्षण अहवाल २०२४-२५ यासह विविध विषयांवर चर्चा होवून मान्यता देण्यात आली.
यावेळी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी. इंगळे व कुलसचिव डॉ.विनोद पाटील मंचावर उपस्थित होते. या बैठकीत शै.वर्ष २०२६-२७ पासून सामाजिक शास्त्रे प्रशाळेत बी.एस.डब्ल्यू. हा पदवी अभ्यासक्रम, वाणिज्य प्रशाळेत एम.कॉम. हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेत बी.एस्सी. (ॲप्लाईड एन्हॉयमेंटल ॲण्ड अर्थ सायन्सेस) हे तीन नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यास अधिसभेने मान्यता दिली.विद्यापीठाचा सन २०२६-२७ च्या एक वर्षीय बृहत आराखड्यास कुलगुरूंनी अधिसभेच्या वतीने दिलेल्या मान्यतेला सहमती देण्यात आली. वित्त व अधिकारी सीए रवींद्र पाटील यांनी विद्यापीठाचा लेखा परिक्षण अहवाल २०२४-२५ अहवाल सादर केला. यावर चर्चा होवून हा अहवाल मान्य करण्यात आला.
तसेच या बैठकीत विद्यार्थी विकास विभाग व विद्यार्थी तक्रार निवारण समितीचा सन २०२४-२५ वार्षिक अहवाल संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सादर केले. या अहवालांना मान्यता देण्यात आली. १६ ऑक्टोबर २०२४ ते ३० जून २०२५ या कालावधीतील क्रीडा व शारिरीक शिक्षण मंडळाचा अहवाल डॉ. दिनेश पाटील यांनी मांडला त्यास मान्यता देण्यात आली. आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचा सन २०२४-२५ अहवाल डॉ. आशुतोष पाटील यांनी मांडला त्यास मान्यता देण्यात आली.
सभेच्या सुरुवातीस प्रश्नोत्तराच्या तासात अधिसभा सदस्य अमोल मराठे, अमोल सोनवणे, ऋषिकेश चित्तम, दिनेश चव्हाण, जयवंत मगर व प्रा.धिरज वैष्णव यांनी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. व्य. प. सदस्य नितीन झाल्टे, डॉ. जगदीश पाटील, डॉ. शिवाजी पाटील, परीक्षा मूल्यमापन मंडळ संचालक प्रा. योगेश पाटील यांनी प्रश्नां संदर्भात माहिती दिली. यावेळी नितीन ठाकूर, डॉ. गजानन पाटील, डॉ. संदीप नेरकर, स्वप्नाली काळे, केदारनाथ कवडीवाले, डॉ. पवित्रा पाटील, ॲङ अमोल पाटील, वैशाली वराडे यांनी चर्चेत सहभाग घेतला.प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यांनी गुणवत्तेसाठी राखीव तासात विद्यापीठाने गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. या सभेत नवनियुक्त सदस्य आमदार अमोल जावळे व वैशाली वराडे यांचे स्वागत करण्यात आले. सभा सायंकाळ उशीरापर्यंत सुरु होती.
या सभेत अधिसभा सदस्य विलास जोशी, दीपक पाटील, डॉ. कांचन महाजन, निशांत रंधे, केदारनाथ कवडीवाले, प्राचार्य एस.एस.राजपूत, प्रा.जगदीश पाटील, प्रा.अनिल डोंगरे, विजय आहेर, डॉ.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. राजेश जवळेकर, डॉ.दिनेश पाटील, प्रा.आशुतोष पाटील, प्राचार्य संजय सुराणा, प्राचार्य एस.एन. भारंबे, प्राचार्य सखाराम पाटील, प्राचार्य सुनील पवार, डॉ. पवित्रा पाटील, प्राचार्य वैशाली पाटील, डॉ.मंदा गावीत, प्रा.सुरेखा पालवे, प्रा. वर्षा पाटील, प्रा.विशाल पराते, प्रा.किर्ती कमलजा सर्व सदस्यांनी विविध विषयांवर चर्चेत भाग घेऊन काही उपयुक्त सूचना केल्या. सभा सायंकाळ् उशीरापर्यंत सुरु होती.






