दिवाळीनंतर सोन्याच्या दरात किंचित घट, चांदीतही मंदीचा कल!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । दिवाळी सण संपताच जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनांनी आजचे ताजे दर जाहीर केले आहेत. मागील काही दिवसांत सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्याच्या भावात आज किंचित घट झाली आहे, तर चांदीच्या दरातही मंदीचा कल दिसून आला आहे.
आजचे दर :
- २२ कॅरेट सोने : ₹१,१३,५८० प्रति तोळा
- २४ कॅरेट सोने : ₹१,२४,००० प्रति तोळा
- चांदी : ₹१,५८,००० प्रति किलो
(Rates may change during the day)
गेल्या आठवड्यात धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या दराने ₹१.३१ लाखांचा उच्चांक गाठला होता. परंतु सणानंतर बाजार स्थिर होत असल्याने दरात थोडी घट झाली आहे. चांदीच्या भावातही दोन दिवसांपासून मंदीचे संकेत दिसत आहेत, तरीही लग्नसराईच्या हंगामामुळे मागणी कायम राहण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की आगामी नोव्हेंबर महिन्यात लग्नाचा हंगाम सुरू होताच पुन्हा दरात तेजी येऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी या दरकपातीचा फायदा घेऊन गुंतवणूक करावी, असे मत आर्थिक विश्लेषक व्यक्त करत आहेत.
जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनांमध्ये दिवाळीनंतरही आकर्षक ऑफर्स आणि शुद्धतेची हमी सुरू आहे. ग्राहकांचा विश्वास आणि पारदर्शक व्यवहार यामुळे भंगाळे गोल्ड जिल्ह्यातील सर्वाधिक पसंतीचे दालन ठरले आहे.



