जळगावात पं.भातखंडे व पं.पलुस्कर स्मृती संगीत समारोह
विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालयातर्फे दि.१७ व १८ सप्टेंबर रोजी २ दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी I अभिजात भारतीय संगीत जनमानसात रुजवणारे महान संगीतोद्धारक पं.विष्णू दिगंबर पलुस्कर आणि पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालय द्वारा संगीत के प्रणेता* या संगीत समारोहाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. यावर्षी प्रथमच या महोत्सवाचे दि.१७ व १८ सप्टेंबर रोजी दोन दिवसीय संगीत समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन दिवसीय महोत्सवात विवेकानंद प्रतिष्ठानच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांसह जळगाव शहर तथा भुसावळ, पाचोरा,जामनेर इ.शहरातील संगीत शिक्षक आपल्या शिष्यांसह सहभागी होणार असून आपली कला सादर करणार आहेत. या महोत्सवात रसिक श्रोत्यांना दोन दिवस शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन,वादन आणि नृत्याची मेजवानी मिळणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवाच्या यशस्वीते साठी विविध समित्यांचे गठन केले असून तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
दि.१७ रोजी विवेकानंद प्रतिष्ठान संगीत विद्यालय ,सुयोग काँलनी येथे दु ४:०० वा.महोत्सवाचा शुभारंभ होईल. तर दि.१८ रोजी सायं ७:३० वा.भैरवीने महोत्सवाचा समारोप होईल.
जिल्ह्यातील सर्व कलासाधक विद्यार्थी, गुरु,शिक्षक,पालक व अधिकाधिक रसिक श्रोत्यांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन संगीत विद्यालय तथा आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.





