SocialSport

पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्ससाठी जळगावचे फैजान शेख यांची राष्ट्रीय पातळीवर निवड!

पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्ससाठी जळगावचे फैजान शेख यांची राष्ट्रीय पातळीवर निवड!

जळगाव – जळगाव जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरवत फैजान शेख यांची पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स २०२५ मधील राष्ट्रीय सेपक टकरॉ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा दिनांक १९ ते २४ मे २०२५ दरम्यान केंद्रशासित प्रदेश दिव येथे आयोजित करण्यात येणार आहे. फैजान शेख हे या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य सेपक टकरॉ असोसिएशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ८ व ९ मे रोजी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अलिबाग बीच येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत फैजान शेख यांचा चमकदार खेळ लक्षवेधी ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. जळगाव जिल्ह्यातून अबुझर बागवान आणि फैजान शेख यांनी सहभाग नोंदवला होता, त्यामधून फैजान शेख यांची अंतिम निवड झाली.

फैजानच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जळगाव जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. जळगाव जिल्हा सेपक टकरॉ असोसिएशनचे अध्यक्ष एजाज अब्दुल गफार मलिक, प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विद्यापीठ क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, डॉ. प्रदीप तळवलकर, प्रा. इकबाल मिर्झा, राजेश जाधव, प्रवीण पाटील, प्रा. वसीम मिर्झा, शहबाज शेख, आसिफ मिर्झा, इमरान शेख, कैफ पठाण, अमीर खान व इतर सर्व सदस्यांनी फैजान शेख यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

फैजान शेखच्या या यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात नवा उत्साह निर्माण झाला असून येणाऱ्या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्ह्यातून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button