बहाळच्या सरपंचासह तिघांना दोन लाखांची लाच स्वीकारताना अटक
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव प्रतिनिधी :- शेतजमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोर्टकचेरीचा त्रास होऊ न देण्याच्या मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून देण्याच्या नावाखाली सुरुवातीला दहा लाखांची रक्कम तडजोडीअंती पाच लाखांची लाच देण्याचे ठरल्यानंतर पहिला हप्ता म्हणून दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ ग्रामपंचायतच्या सरपंचासह शिपाई आणि एका खाजगी इसमाला धुळ्याच्या एसीबीच्या पथकाने आज अटक केली असून यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की तक्रारदार यांचे चाळीसगाव तालुक्यातील मौजे बहाळ रथाचे येथे गट क्रमांक 57 /2 एक हेक्टर 64 आर अशी शेत जमीन असून या शेत जमिनीवर ग्रामपंचायत ने त्यांचा हक्क दाखवून सदरची जागा परस्पर इतर व्यक्तीला भाडेतत्त्वावर देण्याची शक्यता असल्याने तक्रारदार यांनी ग्रामपंचायती विरुद्ध न्यायालयातून कायमस्वरूपी मनाई हुकूम आणला होता. त्यानंतर आरोपी राजेंद्र महारु मोरे याने तक्रारदार यांना भेटून शेत जमिनी बाबत ग्रामपंचायत कडून कोणताही कोर्टकचाऱ्यांचा त्रास होऊ न देण्याचा मोबदल्यात दीड हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी करून द्यावा लागेल असे सांगून दहा लाख रुपये लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीच्या धुळे कार्यालयात तक्रार दिली तक्रार दिली. तक्रारदारांच्या तक्रारीची 29नोव्हेंबर रोजी पंचांग समक्ष केले असता सरपंच राजेंद्र मोरे आणि शिपाई शांताराम तुकाराम बोरसे यांनी दहा लाख रुपये ची मागणी करून तडजोडी अंती पाच लाख रुपयांचे 26 डिसेंबर रोजी तक्रारदाराच्या राहत्या घरी पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये पंचासमक्ष स्वीकारताना दोघांसह सुरेश सोनू ठेंगे या तिघांना रंगेहात पकडण्यात आले. तिघांवरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, राजन कदम, हवालदार पावरा,, सुधीर मोरे, रामदास बारेला, प्रवीण पाटील यांनी कारवाई केली.