भडगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
साई समर्थ मतिमंद विद्यालयात शालेय शिक्षण साहित्य व फळ वाटप

भडगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
साई समर्थ मतिमंद विद्यालयात शालेय शिक्षण साहित्य व फळ वाटप
भडगाव प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.आमदार कै अण्णासाहेब पाटील यांच्या प्रेरणेने आज भडगाव येथे साई समर्थ मतिमंद विद्यालयात शिवजयंती साजरा करण्यात आली.विद्यार्थ्यांना शिवजयंती निमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करून शिवजयंती साजरा करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये एक आगळावेगळा आनंद पाहण्यास मिळाला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले अखिल भारतीय मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख डॉ. बी.बी.भोसले, प्रवीण महाजन सर, पत्रकार सागर महाजन, विजय माळी,विजय पाटील, जितेंद्र पवार, महेश पाटील, प्रवीण पाटील, शिक्षक समाधान पाटील, सोनवणे सर, गोपाल भोई, मराठा महासंघाचे तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होतेआधी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण महाजन सर तर आभार प्रवीण पाटील सर यांनी मानले उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.