मालमत्ता कर थकीत असणाऱ्या 25 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन सोडले!

जळगाव महापालिकेची मोहीम जळगाव : वारंवार मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करून देखील कर न भरणाऱ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई महापालिकेने केली असून शुक्रवारी 25 थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले ही कारवाई पुढे देखील चालू राहील अशी माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली
शहरातील मोबाईल टॉवर्स व मालमत्ताधारकांकडे महापालिकेची २०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये चालू वर्षीच्या८८ कोटी पैकी ४० कोटी वमागील ११६ कोटींपैकी फक्त ७कोटी रुपयांची थकबाकी वसुली झाली असून १५७ कोटी रुपयांची थकबाकी शहरातील मालमत्ताधारकांकडे थकीत आहे. सदर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेडून वारंवार नोटीस बजावण्यात आल्या परंतु तरी देखील त्या थकबाकीदारांकडून थकीत कर भरला जात नाही. त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे यांच्या आदेशाने वसुलीसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी २५ थकबाकीदारांचे नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत.
दरम्यान 80 टक्के वसुली न केल्यास कर्मचाऱ्यांची वेतन वाढ रोखण्याचे निर्देशही मनपा आयक्तांनी दिले आहे.