विद्यापीठाचे कुलसचिवांचा पदभार काढून कार्यमुक्त करण्याची मागणी
जळगाव प्रतिनिधी ;-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र कुलसचिव विनोद पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमधून मिळत असून यामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलीन झाली असून त्यांच्याकडून कुलसचिव पदाचा पदभार काढून त्यांना कार्यमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड कुणाल पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सध्या वर्तमानपत्रातून आपल्या विद्यापीठाच्या कुलसचिव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची बातमी समजली आहे. कुलसचिव महोदयांच्या नियुक्तीच्या वेळेस देखील आपणास आम्ही लेखी हरकत घेऊन त्यांना पदभार देण्यात येऊ नये यासाठी विनंती केली होती कारण त्यांच्यावर यापूर्वी देखील विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढवण्याचा आरोप असून संबंधित खटला न्यायालय प्रलंबित आहे. तरीदेखील आपण त्यांना नियुक्ती दिलेली होती. काल प्रसिद्ध झालेल्या बातमीवरून आपल्या विद्यापीठाची मोठ्या प्रमाणात अब्रू नुकसानी झालेली आहे. कारण कुलसचिव साहेब नेहमी कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत असताना दिसत आहेत. व आज ते आरोपी झालेले असून त्यांच्याकडील पदभार तात्काळ काढण्यात यावा. तसेच त्यांच्या जागी निपक्ष,जबाबदार, प्रामाणिक, आरोपी नसलेली व्यक्ती नेमण्यात येऊन आपल्या विद्यापीठाची झालेली मलीन प्रतिमा सुधारण्यास मदत होइल. 1)सदर प्रकरणात कुलसचिव यांच्यासोबत कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली आहे त्यांचा देखील पदभार काढण्यात यावा.2) मागील काळात अनुकंपा व्यक्तीच्या नोकरीसाठी देखील त्यांच्याविषयी दबक्या आवाजात विद्यापीठात वेगळी चर्चा होती. त्या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच कुलसचिव विनोद प्रभाकर पाटील यांना तात्काळ पद मुक्त करण्यात यावे.3) सन 2016 मध्ये अभियांत्रिकी शाखेच्या 216 विद्यार्थ्यांच्या मार्क मध्ये (80/20) पॅटर्न संगणकात फेरफार करून चुकीच्या पद्धतीने पदाचा दुरुपयोग करून नापास विद्यार्थ्यांना पास केलेले आहे. त्यांच्या मार्चमध्ये अजून देखील दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तत्कालीन कुलगुरू पीपी पाटील यांनी त्या संदर्भात तत्कालीन परीक्षा नियंत्रक अमोल राव बोरसे यांची चौकशी समिती नेमली होती. त्याच्यावरची देखील माहिती आपणास आहे. त्यावेळी देखील त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. यासंदर्भात जळगाव येथील न्यायालयात फौ खटला न 610/2008 सरकार विरुद्ध जितेंद्र शिरसाट वगैरे प्रलंबित आहे. त्यात कलम 173 नुसार सदरचे रेकॉर्ड न्यायालय सादर करण्यासाठीचा आदेश म्हणजेच सर्च वॉरंट आजदेखील प्रलंबित आहे. ह्या सर्व प्रकारमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. त्यांच्यावरील आरोप जोवर आहेत तोवर त्यांना पदमुक्त करावे.कुलसचिव हे विद्यापीठाच्या सर्व कागदपत्रांचे जतन करणारे जबाबदार अधिकारी असतात. तसें न झाल्यास विद्यार्थी वर्गाचा असंतोष वाढेल. तसेच लोकांचा विद्यापीठावरचा असलेला विश्वास कमी होईल असे निवेदनात म्हटले असून lत्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात यावा अन्यथा विद्यापीठात आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.