भाजप भडगाव तालुकाध्यक्ष पदी विनोद नेरकर यांची नियुक्ती जाहीर

भडगाव (प्रतिनिधी) आज २२/८/२०२५ रोजी भाजपा नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या आदेशानुसार प्रदेश महामंत्री विजय चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी. रविंद्र अनासपुरे यांच्या सुचनेनुसार खा. स्मिताताई वाघ, आ. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पळासखेळे येथील निष्ठावंत कार्यकर्ते विनोद नेरकर यांची भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्हाच्या भडगाव तालुकाध्यक्ष (मंडल अध्यक्ष) पदी नियुक्ती करण्यात आली असून हि नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात यावे असे जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे.
यावेळी वरील पदाधिकाऱ्यांसह ना. संजय सावकारे, आ. राजुमामा भोळे, आ. अमोल जावळे, विधानसभा निवडणुकीत प्रमुख अमोल शिंदे, माजी आ. दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, जिल्हा उपाध्यक्षा नुतन पाटील, जिल्हा चिटणीस प्रमोद पाटील, माजी जि. प. सदस्य श्रावण लिंडायत, माजी नगरसेवीका योजना पाटील, माजी नगरसेवक मनोहर चौधरी, माजी नगरसेवक सचिन चोरडिया, पर्यावरण आघाडी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, माजी सैनिक आघाडी जिल्हाध्यक्ष देविदास पाटील, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष डिगांबर पाटील, अंत्योदय आघाडी जिल्हाध्यक्ष धनराज पाटील, माजी शहराध्यक्ष शैलेश पाटील, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस प्रदिप सोमवंशी, ओबिसी आघाडी जिल्हा सरचिटणीस बापू शार्दुल, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष साहेबराव महाजन, भाजयुमो विधानसभा संयोजक किरण शिंपी, शहराध्यक्ष मुन्ना परदेशी, शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजयुमो जिल्हा चिटणीस विकास महाजन, प्रदिप पाटील, क्रीडा आघाडी तालुकाध्यक्ष रविंद्र वाडेकर सह भडगाव तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकाधिक कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीन. ना. गिरीषभाऊ महाजन, आ. मंगेश दादा चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी व विधानसभा निवडणुक प्रमुख अमोल भाऊ शिंदे यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी ही सार्थकी लावायचे मी अश्वाशीत करतो.
विनोद देविदास नेरकर, नवनियुक्त भडगाव तालुकाध्यक्ष (मंडल अध्यक्ष)






