हैदराबाद हिसार एक्सप्रेस मधून प्रवाशाची सुटकेस लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक

हैदराबाद हिसार एक्सप्रेस मधून प्रवाशाची सुटकेस लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक
जळगाव प्रतिनिधी हैदराबाद हिसार एक्सप्रेस मधून एका प्रवाशाची सुटकेस लांबविणाऱ्या महिलांच्या टोळीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे,
कन्हैयालाल रतीलाल सुगंधी (वय ५०, रा. हैदराबाद)
हैदराबाद येथून बऱ्हाणपूर येथे हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने जात असताना ते प्रवासात झोपल्याचा फायदा घेऊन चार महिलांनी त्यांच्या जवळील सुटकेस लांबवून या महिलांनी दुसऱ्या रेल्वेत प्रवास सुरू केला. मात्र लोहमार्ग व आर पी एफ च्या पथकाने या टोळीला रविवारी दोन रोजी सीसीटीव्ही फुटेज वरून त्यांना ताब्यात घेतले .त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील कन्हैयालाल सुगंधी प्रवासात झोपलेले असताना नगरसोल ते मनमाड स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये रोख सात हजार रुपयांसह सोन्याचे दागिने व कपडे असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता. या विषयी त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली.
या घटनेचा तपास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे प्रफुल्ल खर्चे, गजानन पाटील, महेंद्र कुशवाह, शबाना तडवी, मनीष सिंग तसेच जळगाव लोहमार्गचे पोहेकॉ सचिन भावसार, रवी पाटील, सतीश पाटील, राहुल गवळी यांना दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये चार महिला संशयितरित्या आढळून आल्या.
पोलिसांनी या महिलांची चौकशी करीत निशा अशोक बेर्डे (वय ३९), राहया शिंदे (वय २०), पूनम संदीप बर्डे (वय २२), गोधाबाई सतीश बर्डे (वय २०, सर्व रा. येरमाला वस्ती, पारधी फाटा, उस्मानाबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या महिलांकडे चोरीला गेलेली सुटकेस आढळली. पथकाने ती ताब्यात घेत चारही महिलांना अटक केली.
दरम्यान हैदराबाद-हिसार एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर या महिला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरल्या. तेथून त्या दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये बसून प्रवास करीत होत्या. त्याचवेळी चोरी झाल्याचा संदेश मिळाल्याने याच रेल्वेत रेल्वे सुरक्षा बलाच्या वरील पथकाने त्यांना ताब्यात घेतले.