Crime

अमळनेरमध्ये वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन थांबवा; नो पार्किंगमध्ये उभी केलेल्या वाहनांवर पोलिसांची कडक कारवाई

अमळनेर – शहरातील मोरया हॉस्पिटल, बहुगुणे हॉस्पिटल, तसेच धुळे रोडवरील आयडीएफसी बँक आणि ॲक्सिस बँक परिसरात नो पार्किंग झोनमध्ये बिनधास्तपणे वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांविरोधात अमळनेर पोलिसांनी आज सक्त कारवाई केली.

या कारवाईदरम्यान एकूण पंधरा हजार सातशे रुपये (₹15,700) इतका दंड करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या स्पष्ट आदेशानुसार, पोलीस हवालदार विनय पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास बागुल यांनी ही कारवाई अंमलात आणली.

पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, शहरात कोणत्याही नो पार्किंग झोनमध्ये वाहन उभं केल्यास तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारच्या कारवाया रोज सुरू राहतील.

वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, सार्वजनिक ठिकाणी अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जाईल, असा निर्वाणीचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button