Crime

जिल्हा हादरला : ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून हत्त्या!

महा पोलीस न्यूज | १२ जून २०२४ | जळगाव जिल्ह्यातील खुनाची मालिका थांबत नसताना मंगळवारी सायंकाळी माणूसकीला काळीमा फासणारी घटना जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण बुद्रुक येथे घडली आहे. मोलमजुरी करणाऱ्या दांपत्याच्या ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून गळा दाबून हत्त्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयितांची ओळख पटवली असून शोध सुरू आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत काही आदिवासी कुटुंब राहतात. सध्या पेरणीचे दिवस सुरु असल्याने सर्व कुटुंबीय शेतात मोलमजुरीसाठी जातात. मंगळवारी एक दांपत्य आपल्या सहा वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी सोडून कामानिमित्ताने दुसरीकडे गेले होते. मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत जवळच रहात असलेल्या एका पंचवीस वर्षीय नराधमाने त्या अल्पवयीन मुलीला तुला खायला खाऊ घेऊन देतो असे सांगून सोबत घेऊन गेला.

दुकानातून काही खायची वस्तू घेऊन त्या मुलीला गोड बोलून चिंचखेडा बुद्रुक गावाजवळील एका केळीच्या मळ्यात नेऊन तिच्यावर अमानुषपणे अत्याचार केला आणि नंतर तिला जीवे ठार मारले. पीडित अल्पवयीन मुलीचे आईवडील सायंकाळी कामावरुन घरी आल्यावर त्यांनी मुलीला घरात पाहिले घरात मुलगी दिसली नाही म्हणून त्यांनी आसपासच्या शेजाऱ्यांना विचारपूस केली मात्र मुलगी सापडली नाही तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना ही घटना सांगितली तेव्हा गावकऱ्यांनी मुलुचा सर्वदूर शोध घेतला असता ती मुलगी एका केळीच्या मळ्यात मृत अवस्थेत आढळून आली.

गावकऱ्यांनी तातडीने जामनेर पोलीस स्टेशनला घटनेविषयी सविस्तर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी त्याच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत सविस्तर माहिती जाणून घेत मृत मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला.

या घटनेनंतर अधिक तपास केला असता याच वस्तीतील सुभाष इमाजी भिल वय ३५ हा तरुण बेपत्ता झाला असल्याचे दिसून आले. तसेच मुलीचा मृतदेह व घटनास्थळ पाहीला असता मयत मुलीवर अत्याचार करुन तीला मारुन टाकले असावे असा अंदाज व्यक्त केला जात असून या घटनेबाबत केकतनिंभोरा, चिंचखेडा बुद्रुक, जामनेर शहर व जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button