अभेद्या फाऊंडेशन शिक्षणघरतर्फे तांबापुरा येथे बुद्ध पौर्णिमा उत्सव साजरा

जळगाव महापोलीस न्यूज l दि. १४ मे २०२५
अभेद्या फाऊंडेशन शिक्षणघर यांच्या वतीने आज, वैशाखी पौर्णिमेनिमित्त तांबापुरा, मच्छीबाजार भागात भगवान बुद्ध पौर्णिमा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरुवात बालगटाच्या बौद्ध वंदनेने झाली. एकता, बंधुता आणि समानतेसाठी कार्यरत राहण्याची शपथ घेऊन उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक अडथळा टाळण्याचे, तसेच सर्व भारतीयांना बंधू-भगिनी मानून देशात एकता, बंधुता आणि समानता प्रस्थापित करण्याचे वचन देण्यात आले. यानंतर खीर वाटप आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमाला मुले, घरेलू कामगार महिला आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभेद्या फाऊंडेशन शिक्षणघरच्या अध्यक्षा वैशाली झाल्टे चौधरी, अॅड. राजेश झाल्टे आणि प्रितेश अनिल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या उत्सवाने सामाजिक एकतेचा संदेश देत बुद्धांच्या शांततामय तत्त्वांचा प्रचार केला.