ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; अजिंठा चौफुली जवळील घटना
जळगाव: भुसावळ कडून इच्छा देवी चौफुलीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकील जोरदार धडक दिल्याने या घटनेत 55 वर्षीय इसम ठार झाल्याचे घटना 18 रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुली येथे घडली असून याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकासह ट्रक ताब्यात घेतला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
विठ्ठल पांडुरंग शेळके (वय ५५, रा.रामेश्वर कॉलनी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, विठ्ठल शेळके हे एका नाश्त्याच्या दुकानावर कामाला होते. रात्री दुकानावरुन ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. यावेळी भुसावळ कडून ईच्छादेवी चौफुलीकडे भरधाव वेगाने डाळ घेऊन जाणाऱ्या जाणाऱ्या (जीजे १४, एटी २४२४) क्रमांकाच्या ट्रकने दुचाकीस्वार विठ्ठल शेळके यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वरुग्णालयात दाखल केला. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विठ्ठल शेळके यांना मयत घोषीत केले.
दरम्यान, पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.