बहुजन चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व सुरेश अंभोरे यांचे हृदयविकाराने निधन

बहुजन चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व सुरेश अंभोरे यांचे हृदयविकाराने निधन
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील बहुजन चळवळीतील अग्रगण्य व समाजकार्याबद्दल ओळख असलेले सुरेश अंभोरे यांचे आज, दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बहुजन समाजात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्वर्गीय सुरेश अंभोरे हे महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय अंभोरे आणि गृह विभागात कार्यरत सुधाकर अंभोरे यांचे थोरले बंधू होत. त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या राहत्या घरी भेट देऊन श्रद्धांजली अर्पण केली.
अंभोरे यांचा अंत्यविधी उद्या (२६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता राहत्या घरून गेंदालाल मिल परिसरातील जैन मंदिराजवळून नेरी नाका स्मशानभूमीकडे नेण्यात येणार आहे.
बी. एम. फाउंडेशन इंडियातर्फे सुरेश अंभोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे






