Accident : डंपरची धडक, ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने एक ठार, दोघे जखमी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर ते दूध फेडरेशन रस्त्यावर असलेल्या मिथिला अपार्टमेंटसमोर एका भरधाव डंपरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जखमी झाले आहेत. घटनास्थळी शहर पोलिसांनी धाव घेतली असून डंपर ताब्यात घेतला आहे. अंकुश आत्माराम भिल वय-२७, रा.डिकसाई ता.जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील मिथिला अपार्टमेंटजवळून ट्रॅक्टर क्रमांक एमएच.१९.एएन.२९०६ विटा घेऊन जात असताना तेथील वळणजवळ मागून येणाऱ्या मागून येणाऱ्या डंपर हा ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला जोरदार धडक मारली. धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भिल वय-२२, गणेश भगीरथ भिल वय-१८, आणि शुभम सुखा भिल वय -२० तिघे राहणार इदगाव ता.जळगाव हे तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मयत अंकुशच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, शिवाजीनगर येथील स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करत, या रोडवरून अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी केली आहे. मिथिला अपार्टमेंटच्या रहिवाशांनी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. यापूर्वी देखील प्रशासनाला या संदर्भात तक्रारी निवेदन देऊन देखील ही याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे.