Crime
नशिराबादजवळ अपघात; दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी

जळगाव (प्रतिनिधी) : नशिराबाद परिसरात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिला दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी किशोर सपकाळे (वय ३५, रा. कानळदा, ता. जळगाव) असे जखमी महिलेचे नाव आहे. त्या आपल्या दुचाकीवरून जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या व गंभीर जखमी झाल्या.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ त्यांना मदत करत रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नशिराबाद पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून, वाहन व चालकाचा शोध सुरू आहे.