ब्रेकिंग : केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर सशस्र दरोडा, जिल्ह्यात खळबळ!

महा पोलीस न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगरला लागुन असलेल्या हायवेवरील केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर मोटारसाईकलने आलेल्या पाच अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला. हि घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरला लागुन जळगाव मार्गावर हायवेला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे. गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास पाच अज्ञात हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत केबिनमधील कॉम्प्युटर, सीसीटिव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तुंची तोडफोड केली आणि डिव्हिआर देखील लांबवला.
हल्लेखोरांनी दिलीप खोसे व प्रकाश माळी या कर्मचाऱ्यांना मारहाण केली असून कर्मचाऱ्यांना एका केबिनमध्ये कोंडून १ लाखापेक्षा जास्तीचा ऐवज लांबविला आहे. दरोडेखोर वरणगावच्या दिशेने दुचाकीवरुन पसार झाले. मुक्ताईनगर व वरणगाव पो.स्टे.चे पोलीस दरोडेखोरांच्या मागावर आहेत.
माहितीनुसार तीन संशयितांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून अधिक तपास सुरू असल्याचे समजते.






