एलसीबीची कारवाई : ३ ठिकाणी नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर छापा
महा पोलीस न्यूज । दि.८ डिसेंबर २०२४ । शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिले होते. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पतंग गल्ली, जोशी पेठ जळगाव येथे जावून तिथे दोन ठिकाणी तसेच भुसावळ शहरात भज्जेगल्ली सराफ बाजार अश्या ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीलाच केलेल्या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात आकाशात पतंग उडवण्यास सुरुवात झाली असून विविध प्रकारचे मांजा विक्रीसाठी आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरातील पतंग गल्ली जोशीपेठ भागात कारवाई करून किरण भगवान राठोड याचेवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून ४ हजार ८०० रुपयांचे १६ नायलॉन मांजा चक्री जप्त केल्या आहेत.
जळगाव शहरातील पतंग गल्ली जोशीपेठ भागात कुणाल नंदकिशोर साखला याचेवर शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ हजार ८०० रुपयांचे ३२ नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आल्या आहेत. पथकाने भुसावळ शहरात भज्जेगल्ली सराफ बाजारातील अजय काईट नावाचे दुकानावर छापा टाकुन नितीन गोपाळ पतकी याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून १ हजार ४०० रुपयांच्या ६ नायलॉन मांजा चक्री जप्त करण्यात आल्या आहेत.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, पोहेकॉ हरीलाल पाटील, प्रदिप सपकाळे, प्रदिप चवरे, गोपाल गव्हाळे, सचिन पोळ यांनी केली आहे.