Social
फोटोशूट : अभिनेत्री प्रिया मराठेंना ‘पाल’ची भुरळ!
महा पोलीस न्यूज | १ मार्च २०२४ | अनेक मराठी मालिका तसेच पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांना देखील पाल हिल्स स्टेशनने भुरळ घातली आहे. एका शूटसाठी त्या आल्या असता त्यांनी देखील स्वतःचे फोटो शूट केले.
जळगाव जिल्ह्यातील निवडक दहा ऐतिहासिक पर्यटनस्थळांच्या अतिऊच्च दर्जाच्या रिल्स सोशल मिडियावर प्रसारित करणाच्या हेतूने व्हिडिओ शूट करण्याकरिता अभिनेत्री प्रिया मराठे यांनी नुकतेच पाल टुरिझमला भेट दिली. यावेळी वनक्षेत्रपाल अजय बावणे व वनपाल अरूणा ढेपळे यांनी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे यावल वन विभागाचे कॅलेंडर देऊन स्वागत केले.