“दुर्लक्षित घटकांना” जळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे ‘महाआरती’चा मान

जळगाव: सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ, जळगावने यावर्षीही श्री गणरायाच्या महाआरतीचा मान समाजातील दुर्लक्षित घटकांना देऊन आपली १५ वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही मंडळाने समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींना आदराने आमंत्रित करून त्यांच्या हस्ते आरती केली, ज्यामुळे सामाजिक समरसतेचा संदेश देण्यात आला.
यंदाच्या गणेश आगमन सोहळ्यातील महाआरतीचा विशेष मान गुलाबी रिक्षा चालक सौ. पौर्णिमा कोळी यांना देण्यात आला. पौर्णिमा कोळी या स्वतःच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवण्यासोबतच महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठीही कटिबद्ध आहेत. त्यांच्यासोबतच सफाई मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष अजय घेंगट, लक्ष्मण अंभोरे, सौ. सविता झणके, श्री शिवाजी झणके, श्री अरविंद सौदे व सौ. कविता सौदे, सौ. विद्या नंनवरे आणि श्री कुलदीप नंनवरे यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींनीही आरतीचा मान स्वीकारला.
मंडळाच्या या उपक्रमात यंदा श्री गणाधीश फाउंडेशन, नवीपेठ मित्र मंडळ, स्नेहल प्रतिष्ठान पिंप्राळ्याचा राजा आणि ओम साई नगर युवक मित्र मंडळ या गणेश मंडळांनीही सहभाग घेतला. या सोहळ्याला सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष श्री सचिन नारळे, ज्येष्ठ पदाधिकारी किशोर भोसले, माधव कुळकर्णी, समन्वयक सुरज दायमा, शरीफ पिंजारी, छोटू अग्रवाल, मनीष झंवर, अजिंक्य देसाई, चेतन पाटील, धनंजय चौधरी, भूषण शिंपी, विनोद अनपट, सुजय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.






